जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते आदर्श ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.०४ :- भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार असून ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे आणि वैविध्यपूर्ण असे विविध अनेक प्रकल्प सुरु आहेत. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणि वाकायामा हे नाते एक आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.
कोणतीही करवाढ नसलेला महापालिकेचा अर्थसंकल्प सादर – एकूण अर्थसंकल्प ५२,६१९ कोटी रुपयांचा
गेट वे ऑफ इंडिया येथे शुक्रवारी महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा आदिउपस्थित होते.
मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद
ऑक्टोबर २०१३ मध्येच उभयंतामध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला आहे. या कराराची ही दशकपूर्ती आहे. या कराराचे आज आपण नूतनीकरणच करत आहोत. गेल्या दहा वर्षांत या करारातील उद्दिष्टांची जी पूर्ती झाली त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो आणि या नव्या करारासाठीही शुभेच्छा असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यटनाच्या क्षेत्रात जपानने खूप मदत केली आहे. जपानमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे कार्यालय आहे आणि संभाजीनगरमध्ये जपानचे कार्यालय आहे.
बृहन्मुंबई महापालिकेची नाट्यगृहे आणिज लतरण तलावांच्या ठिकाणी आता पुस्तकांची विक्री
या नवीन सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर जपान आणि राज्याचे संबंध अधिकच मजबूत होतील. या सामंजस्य करारामुळे जपान आणि महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक देवाण- घेवाण होऊन पर्यटनाला चालना मिळेल. तर अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायमा शासनाने ३०० कोटी रुपयांचे सहकार्य केले, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या वेळी सुमो व महाराष्ट्रीयन कुस्तीची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते.