भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी उपयुक्त अर्थसंकल्प – डॉ. नरेंद्र जाधव
मुंबई दि.०३ :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा भविष्यातील काही चांगल्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरणारा आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी सदस्य, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी गुरुवारी येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आयोजित केलेल्या ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ व्याख्यानात ते बोलत होते.
तळमळीतूनच साहित्य आणि राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
येत्या वर्षात भांडवली खर्चात ३३ टक्के म्हणजे १० लाख कोटीपर्यंत प्रस्तावित केलेली वाढ आर्थिक विकासाला उपयुक्त ठरू शकेल. अनेक नव्या योजना जाहीर केल्या असून त्यातील भरड धान्याला प्राधान्य, सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्याच्या योजना, ग्रामीण भागात नाशवंत मालाचा साठा करण्यासाठी गोदामे, ‘ग्रीन ग्रोथ’साठी विविध योजना, मुला-मुलींसाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल डिजिटल लायब्ररी, नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी या योजना भविष्याचा वेध घेणाऱ्या आहेत, असेही जाधव यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या आजपासून (३ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित
अर्थसंकल्पातील विविध बाबींवर भाष्य करताना ते म्हणाले, करोना काळात २०२०-२१ या वित्तीय वर्षात केंद्र सरकारची वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ९.२ टक्क्यांपर्यंत वाढली होती. करोना काळात ते क्षम्य होते; परंतु त्यानंतर त्यात कपात करून वित्तीय तूट ४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे गरजेचे होते. ते काम करण्याचाही प्रयत्न यात झाला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार
या विश्लेषणाच्या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आदि उपस्थित होते. हे विश्लेषण यूट्यूब आणि सावरकर स्मारकाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपित करण्यात आले.
सुरुवातीला सावरकर कला प्रबोधिनीच्या अथर्व कंठी, मृण्मयी सहानी, प्रांजल सरोज, प्रणिता आमकार, शुद्धी तळवलकर यांनी सावरकरलिखित शस्त्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत देव यांनी केले.