ठळक बातम्या

तळमळीतूनच साहित्य आणि राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा
९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे उदघाटन

वर्धा दि.०३ :- जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात. जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्यशासन कायम आदर करत आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील आचार्य विनोबा भावे सभामंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार

संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर, शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते आदि यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ

वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. हे दोन्ही महान नेते एक उत्तम लेखक होते. या प्रभावळीत लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर,स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदी राजकीय नेतेही हे येतात. लोकसेवेचे व्रत घेवून या सर्व नेत्यांनी साहित्यातूनच आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची मोट बांधल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तालिबानशी संबंधित व्यक्ती मुंबईवर हल्ला करणार असल्याचा ई मेल प्राप्त

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या संदर्भात मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या ठिकाणी ‘लाईट, साऊंड अँड लेझर शो’ राज्य शासना मार्फत सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्ध्याच्या वैभवात भर घालण्यासाठी सौदर्यीकरणाची ही मागणी मान्य करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, यांचा अंतर्भाव करावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, दत्ता मेघे, पद्मश्री डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी,डॉ. कुमार विश्वास,न्या.नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे, प्रदीप दाते यांचीही भाषणे यावेळी झाली. मुख्यमंत्र्यांच्याहस्ते संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर आणि पूर्वाध्यक्ष भारत सासणे यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमिताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दौत लेखणी’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले.
आयोजन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेले वर्धा गौरव गीत, कविवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य…’ हे मराठी अभिमान गीत आणि संमेलन गीताचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *