बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार
मुंबई दि.०३ :- बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ चे अर्थसंकल्प उद्या (४ फेब्रुवारी) महापालिका मुख्यालयात मांडण्यात येणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार शिक्षण विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पा सादर केला जातो. त्यानंतर मुख्य अर्थसंकल्पाचे सादरीकरण होते.
अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ
दरवर्षी अतिरिक्त आयुक्त हे शिक्षण समिती अध्यक्षांना शिक्षण अर्थसंकल्प सादर करतात तर महापालिका आयुक्त स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करतात. मात्र यंदा महापालिकेची आणि नगरसेवकांची मुदत संपली असल्यामुळे आणि अद्याप निवडणूक झालेली नसल्याने हा अर्थसंकल्प प्रशासकीय स्तरावरच सादर होणार आहे.
तालिबानशी संबंधित व्यक्ती मुंबईवर हल्ला करणार असल्याचा ई मेल प्राप्त
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करणार आहेत.