मुंबई विद्यापीठाच्या आजपासून (३ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित
मुंबई दि.०३ :- अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेसंदर्भातील कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे मुंबई विद्यापीठाच्या आजपासून (३ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार
स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सध्या सुरू आहेत.
अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ
अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीकडून २ फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.