टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव साजरा – विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
डोंबिवली दि.०१ :- अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव २६ ते २९ जानेवारी या कालावधीत पार पडला. मकरोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ या विषयावर समीर लिमये यांच्या ‘कॉर्पोरेट कीर्तन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना लिमये म्हणाले, ३०० वर्षापुर्वी राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकांमध्ये कॅार्पोरेट जगताला लागू होतील अशा गोष्टींवर भाष्य आणि मार्गदर्शन केले आहे.
राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रकमेत वाढ, हा पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा
रघुलीला एन्टरप्रायझेस निर्मित ‘सप्तसूर झंकारीत बोले’ हा नाट्यसंगीतावरील कार्यक्रमही सादर झाला. कार्यक्रमाची संकल्पना संगीत संयोजक आदित्य बिवलकर यांची होती. केतकी चैतन्य, निमिष कैकाडी, ओंकार प्रभूघाटे, धनंजय म्हसकर, प्राजक्ता काकतकर यांनी नाट्य पदे सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक यांचे होते.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे महाराष्ट्राचे ‘राज्यगीत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
भारतरत्न स्व लता मंगेशकर यांनी गायलेल्या हिंदी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांचा ‘मेरी आवाज ही पेहेचान है’ या कार्यक्रमात शरयु दाते, मधूरा कुंभार, सुस्मिरता डवाळकर यांनी गाणी सादर केली. संगीतकार कौशल इनामदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि निवेदन असलेल्या सा कार्यक्रमास अमर ओक, आर्चिस लेले, कृष्णा मुसळे, अमोघ दांडेकर, दिनेश भोसले, अमित गोठिवरेकर, दिप वझे यांची संगीत साथ होती. यांचा सहभाग होता. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे होते. यावेळी वेदिका बूचके हिने मंडळाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे उपस्थितांचे आभार मानले.