राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रकमेत वाढ, हा पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा
मुंबई दि.०१ :- राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची रक्कम वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे महाराष्ट्राचे ‘राज्यगीत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
हा पुरस्कार नव्या स्वरूपात आणि आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी उपस्थित होते.