यंदाचा अर्थसंकल्प सक्षम भारताचा आणि आत्मनिर्भर – ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन
डोंबिवली दि.०२ :- यंदाचा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि सक्षम भारताचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी काल (१ फेब्रुवारी) येथे केले. टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमात ते बोलत होते.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव साजरा – विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षणाबाबतच्या विशेष योजना नसल्या तरीदेखील इतर बऱ्याच मुद्दांमधून सरकारने संरक्षणाच्या विविध पैलूंना अप्रत्यक्षरीत्या सक्षम केले आहे. त्यामध्ये रेल्वेसाठी करण्यात आलेली २.४० लाख कोटींची तरतूद आणि गेल्याच महिन्यात ईशान्येतील दोन राज्यांत सुरू झालेली रेल्वे सेवा यांची सांगड घातल्यास भारत चीनला ईशान्य सिमेवरील राज्यांवर आपली पकड मजबूत करत आणि त्यांचा इतर राज्यांशी परिणामकारक संपर्क प्रस्थापित करीत आहे, असे टिळक यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या रकमेत वाढ, हा पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा
इतकी वर्षे भारत हा संरक्षण आयुधांचा आयात करणारा किंवा इतर देशांना आयुधांचा पर्याय उपलब्ध करणारा देश होता. परंतू या अर्थसंकल्पातून भारत आता संरक्षक आयुधांचा निर्यात करणार देश आहे, असे सांगितले गेले आहे. डिजीटल पेमेंट, रोख व्यवहारांवरील वाढलेले निर्बंध यामुळे बनावट चलनाचा धोकादेखील मोठ्या प्रमाणावर कमी करून देशाच्या संरक्षणाचीच एक बाब सांभाळणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही टिळक म्हणाले.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे महाराष्ट्राचे ‘राज्यगीत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
आयकरामधील सवलतींचे वर्णन टिळक यांनी ‘मी दिल्यासारखे करतो, तुला मिळाल्यासारखे वाटेल’ अशा शब्दांत केले. प्रत्यक्षात नवीन आयकर योजनेमध्ये सर्व करदात्यांना मूलभूतरीत्या घेऊन जाताना त्यांनी इतकी वर्षे केलेल्या आयकर सवलती असणाऱ्या योजनांमधील रक्कम मूदतपूर्व काढल्यास त्यावरील कराबाबत कोणताही उल्लेख केलेला नसल्याने करदात्यांनी आयकर विवरण पत्र दाखल करताना सतर्क रहावे असे आवाहन केले. ज्येष्ठ आणि प्रसिध्द विधिज्ञ दिवंगत नानी पालखीवाला यांनी ३५ वर्षे अर्थसंकल्प विश्लेषणात्मक व्याख्याने दिली. चंद्रशेखर टिळक यांचे अर्थसंकल्पावरील विश्लेषणाचे हे सलग ३६ वे वर्ष आहे.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे महाराष्ट्राचे ‘राज्यगीत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
त्यामुळे एका व्यक्तीने एका विषयावर , तेही आर्थिक विषयावर , सलग ३६ वर्षे बोलणें हा कदाचित विश्वविक्रम असेल. पालखीवाला यांच्या विक्रमाला पार करीत टिळक यांच्या नावाने नवीन विक्रमाची नोंद झाली. त्याबद्दल टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि इतर डोंबिवलीतील संस्थांतर्फे टिळक यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना टिळक म्हणाले, यंदाच्या विक्रमी वर्षात अर्थसंकल्पावरील होणाऱ्या माझ्या सर्व कार्यक्रमांचे मानधन जम्मू काश्मीर येथे शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी देणगी म्हणून देणार आहे. सनदी लेखापाल हिमांशू जोशी यांनी सुत्रसंचलन केले