‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे महाराष्ट्राचे ‘राज्यगीत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई दि.०१ :- ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून घोषित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापासून (१९ फेब्रुवारी) ते राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येणार आहे.
शहरांचे नाव बदलण्यापूर्वी सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या का? – मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
राज्य आज मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिले असून संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. हे गाणे शाहीर साबळे यांनी गायले आहे.