पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात ३५ हजार पुस्तकांचे आदानप्रदान
डोंबिवली दि.०१ :- पै फ्रेन्डस लायब्ररीतर्फे आयोजित पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात ३५ हजार पुस्तकांचे आदानप्रदान प्रदान करण्यात आले तर सहा हजार नवीन पुस्तकांची विक्री झाली.
मुंबई – पुणे मार्गावर लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ बसगाड्या धावणार
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्याकडे असलेली आणि वाचून झालेली पुस्तके आणून त्या बदल्यात तेवढीच अन्य पुस्तके वाचकांना परत मिळत होती.
मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅस स्वस्त
राज्याच्या विविध भागातून सुमारे दोन लाख नागरिकांनी या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याला भेट दिली. वाचन संस्कृती रुजविणे आणि घरातील वाचलेल्या पुस्तकांचे आदानप्रदान व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो, असे उपक्रमाचे आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.