घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर आजपासून १८ जादा फेऱ्या
मुंबई दि.०१ :- घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरह आजपासून १८ जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. घाटकोपर-वर्सोवा मार्गावरील दोन स्थानके मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७शी जोडली जाणार असल्याने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई – पुणे मार्गावर लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ बसगाड्या धावणार
त्यामुळे आज, बुधवारपासून मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांसाठी दररोजच्या फेऱ्यांची संख्या ३९८पर्यंत पोहोचणार आहे. मुंबई मेट्रो वनमार्फत प्रत्येक महिन्यास सुमारे एक कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते. दर दिवशी सुमारे चार लाख प्रवासी याचा लाभ घेत आहेत.
पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात ३५ हजार पुस्तकांचे आदानप्रदान
मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्ग खुला झाल्यानंतर डी. एन. नगर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येत अनुक्रमे ८ हजार आणि ६ हजार प्रवाशांची वाढ झाल्याचे मुंबई मेट्रो वनकडून सांगण्यात आले.