ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला ठाण्यात येणार- उद्धव ठाकरे
ठाणे दि.२६ :- आज मी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलोय आणि उद्या ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क येथे साजरा
ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आयोजित महाआरोग्य शिबीराचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बहुतांश शहरातील आणि औद्योगिक वसाहतींमधील पाणी पुरवठा उद्या बंद
सध्याच्या राजकारणात विकृत आणि गलिच्छपणा आलेला असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इथे आहेत. बाकी जे विकाऊ आहेत कोणत्या भावाने विकले गेले हे तुम्हाला माहिती आहे, असेही ठाकरे म्हणाले.
