दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे मुंबईच्या १२ प्रभागातील पाणीपुरवठा एक दिवस बंद
मुंबई दि.२५ :- भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम येत्या ३० जानेवारी रोजी केले जाणार आहे. परिणामी या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून ३१ जानेवारी रोजी सकाळी दहापर्यंत मुंबईतील १२ विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.
राज्याच्या संचलन सोहळ्यात महापालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक
पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.
गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हे ठरविण्याचा अधिकार संबंधित महिलेला- उच्च न्यायालय
तसेच ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.