राज्याच्या संचलन सोहळ्यात महापालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक
मुंबई दि.२५ :- महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पथ संचलन सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट पथ संचलनाचे द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलास मंगळवारी प्रदान करण्यात आले.
गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हे ठरविण्याचा अधिकार संबंधित महिलेला- उच्च न्यायालय
छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित एका विशेष सोहळ्यादरम्यान अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांच्या हस्ते आणि पोलीस सहआयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार, अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस दल) आरती सिंह यांच्या उपस्थितीत हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
‘ईडी’ अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा – २५ लाख रुपये आणि ३ किलो सोने लुटले
१ मे २०२२ रोजी झालेल्या पथ संचलनात बृहन्मुंबई महपालिकेच्या ७२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असलेल्या पथकानेही भाग घेतला होता. या पथकाचे नेतृत्व विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी संदीप मुळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी नितीन महाजन यांनी केले होते.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील स्थापत्य काम ६५ टक्के पूर्ण
महापालिकेच्या सुरक्षा दलाचे प्रशिक्षक छोटू साळुंखे, रविंद्र परदेशी, दिगंबर अमोदकर यांनी पथ संचलनात सहभागी झालेल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षक भारतीय सैन दलातील सेवानिवृत्त जवान आहेत.
