महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास सुरुवात येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट
मुंबई दि.२५ :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास मंगळवारी सुरूवात झाली. अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
राज्याच्या संचलन सोहळ्यात महापालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक
विधानभवन येथे झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उदघाटन करण्यात आले. शासनाच्या या महत्त्वकांक्षी कार्यक्रमासाठी मुख्य प्रवर्तक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हे ठरविण्याचा अधिकार संबंधित महिलेला- उच्च न्यायालय
राज्याच्या एकूण १३ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास १४ लाख ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. त्याआधारे यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
‘ईडी’ अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा – २५ लाख रुपये आणि ३ किलो सोने लुटले
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या अभियानांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.