गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देऊ नये – महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाची मागणी
मुंबई दि.२२ :-गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने केली आहे.
रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात लोकायुक्तांकडून महापालिकेला ‘क्लिनचिट’
सातारा येथे नवीन निविदा प्रक्रिया राबविताना गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी असलेल्या आणि या प्रकरणात कारागृहातून जामीनावर बाहेर आलेल्या कंत्राटदारांलाच ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सातारा जिल्ह्यात कंत्राटी कामगार पुरविण्याचे कंत्राट पुन्हा दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराची समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणीही संघाने केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे
याबाबत संघटनेने वेळोवेळी ऊर्जामंत्री, प्रधान सचिव ऊर्जा, कामगार आयुक्त, शासननास व तिन्ही वीज कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाच्या वारंवार काही बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात याकडे राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे लक्ष लागले आहे, असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.