‘उबाठा शिवसेना’ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची उद्या घोषणा
मुंबई दि.२२ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अखेर युती होणार असून उद्या (२३ जानेवारी) याबाबतची घोषणा होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.