मुंबईकरांच्या वीज देयकात ५० रुपयांनी वाढ होणार; महावितरण पाठोपाठ अदानी, टाटा यांची याचिका
मुंबई दि.२२ :- ‘महावितरण’ पाठोपाठ अदानी आणि टाटा यांनीही वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. याचिकेवर पुढल्या महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल आणि एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दराप्रमाणे वीजदेयक मिळणार आहे
पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेत घुसखोरी करणा-या बनावट कमांडोला अटक
सध्याचा सरासरी वीज पुरवठय़ाचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) ७. २७ रुपये प्रति युनिट आहे. २०२३-२४ मध्ये इंधन समायोजन शुल्क ओझे आणि गेल्या वर्षीपासून वाढत्या कोळशाच्या किमतीमुळे वीजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. वीजदर वाढल्याने मुंबईकरांच्या वीज देयकात ५० रुपयांची वाढ होणार आहे.