पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेत घुसखोरी करणा-या बनावट कमांडोला अटक
मुंबई दि.२२ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील सभेत घुसणाऱ्या नकली कमांडोला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक नावाचे बनावट ओळखपत्र वापरून त्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.
रामेश्वर मिश्रा असे या बनावट कमांडोचे नाव असून तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. रामेश्वर विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.