प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे
मुंबई दि.२१ :- प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ याचे दर्शन होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मुंबईकरांना विनामूल्य प्रशिक्षण
या चित्ररथाचे काम नवी दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरू आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट संवाद साधला. यानंतर आपल्या प्रयत्नांना यश आले, असेही त्यांनी सांगितले.
विना परवानगी कूपनलिका खोदल्यास कायदेशीर कारवाई
यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवा मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर येत्या २८ जानेवारीला पुरस्कार वितरण
३० जणांचा समावेश असलेल्या टीमला घेऊन राहुल धनसरे महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्ण करण्याचे काम करीत आहेत. अशी माहितीही मुनगंटीवर यांनी दिली. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध असून यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी (तीन पूर्ण) आणि वणीची सप्तशृंगी (अर्ध पीठ) यांचा समावेश आहे.