आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मुंबईकरांना विनामूल्य प्रशिक्षण
मुंबई दि.२१ :- केंद्र आणि राज्य शासनाच्या सुचनेनुसार नुसार १८ ते ४० वयोगटातील मुंबईकर नागरिकांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बृहन्मुंबई महापालिकेच्या परळ येथील आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्यात येणार आहे.
विना परवानगी कूपनलिका खोदल्यास कायदेशीर कारवाई
आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण प्राप्त असलेल्या प्रशिक्षित नागरिकांची गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीतकमी व्हावी, या प्रमुख उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्येकी ५०० याप्रमाणे एकूण १००० नागरिकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर येत्या २८ जानेवारीला पुरस्कार वितरण
अधिक माहिती आणि प्रवेशासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी ०२२ -२२६९४७२५ ते २७ या क्रमांकांवर अथवा co.dm@mcgm.gov.in या ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.