बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण’ उपक्रम
मुंबई दि.२१ :- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी झाली आहे. सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनातर्फे महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीतील उपहारगृहे, शाळा, रुग्णालये (आरोग्य सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटनांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे
‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावरील जिंगल, चित्रफित, भित्तीचित्र, पथनाट्ये सादर करण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या २९ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी केले आहे. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan23 येथे अर्ज करावा.