महापालिकेतर्फे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उद्यान प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई दि.२१ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात येत्या ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उद्यान विद्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह, ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे फुले आणि भाज्या यांचा प्रदर्शनात समावेश असणार आहे. तसेच पानाफुलांपासून साकारलेली पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर अशी नानाविध कार्टून्सही असणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन
प्रदर्शनाचे उदघाटन महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अनेक प्रकार तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते सायंकाळी ८ पर्यंत तर ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.