विना परवानगी कूपनलिका खोदल्यास कायदेशीर कारवाई
मुंबई दि.२१ :- मुंबई व उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात विना परवानगी कूपनलिका खोदल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बृहन्मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर येत्या २८ जानेवारीला पुरस्कार वितरण
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व रहिवासी, बांधकाम व्यावसायिक, विकासक, विंधन विहिरी खणणारे कंत्राटदार, विंधन विहिरी खणण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देणारे कंत्राटदार यांनी वैयक्तिक अथवा सार्वजनिक कूपनलिका खोदण्यापूर्वी बृहन्मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका प्रशासनानाची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन परवानगी घेणे बंधनकारक आहे.
थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता
विनापरवानगी कूपनलिका खोदल्याने होणाऱ्या दुर्घटनेसाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे कळविण्यात आले आहे.