कोकणकन्या एक्स्प्रेस आता अतिवेगवान, क्रमांकात बदल
मुंबई दि.२० :- कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या क्रमांकात आजपासून (२० जानेवारी) बदल करण्यात आला आहे. आता ही गाडी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. गाडीच्या सध्याच्या 10111/10112 या क्रमांकाऐवजी तो क्रमांक आता 20111/20112 असा असणार आहे.
देश आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र, मुंबईचा अभूतपूर्व विकास- पंतप्रधान नरेंद्र मोदी
ही गाडी आता विद्युत इंजिनावर धावणार आहे. नव्या बदलामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या एकूण प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत होणार आहे. कोकणकन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस येत्या २० जानेवारीपासून मडगाव येथून सायंकाळी ४.५० ऐवजी सात वाजता सुटणार आहे.
‘वंदे भारत’ एक्स्प्रेस आता बोरिवलीलाही थांबणार
ती सावंतवाडीला रात्री आठ वाजून ३६ मिनिटांनी, कुडाळला रात्री ८.५८ वाजता, कणकवलीला रात्री नऊ वाजून २८ मिनिटांनी, राजापूरला १० वाजून १४ मिनिटांनी, रत्नागिरी स्थानकावर रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी, चिपळूणला मध्यरात्री नंतर एक वाजून २८ मिनिटांनी तर खेडला ती रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल.
समाज घडवणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावरील मराठी चित्रपट निर्मितीस एक कोटी अनुदान
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर ती नेहमीप्रमाणे पाच वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावकडे येताना सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस आधीप्रमाणेच रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी सुटणार आहे.