वेणुगोपाल धूत यांची जामिनावर सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई दि.२० :-‘आयसीआयसीआय’ बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यानंतर व्हिडीओकॉन समुहाचे वेणूगोपाळ धूत यांची रोख एक लाख रुपयांच्या अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने धूत यांच्या याचिकेवर निर्णय देताना धूत यांची अटक नियमबाह्य ठरवली. तसेच धूत यांना दिलासा दिला.
मेट्रो २ ए, मेट्रो ७ रेल्वे स्थानकांशी संलग्न बेस्ट बससेवा आजपासून सुरू
धूत आणि सीबीआय या दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अटकेला आव्हान देणाऱ्या धूत यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. धूत यांनी अटक आणि त्यानंतर सुनावण्यात आलेल्या सीबीआय कोठडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच अंतरिम जामिनावर तातडीने सुटका करण्याची मागणी केली होती.