पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई भेटीवर, त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण
मुंबई दि.१८ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (गुरुवारी) मुंबई भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मध्य रेल्वे आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे.
डोंबिवलीत पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्राकडे पाठवला होता. पुनर्विकासाचा एकूण खर्च एक हजार ८१३ कोटी रुपये आहे.
डोंबिवलीत पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन
महापालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
मुंबईत २४ ते २७ जानेवारी दरम्यान कामगार कबड्डी स्पर्धा
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या ३ रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील ४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
छेडा नगर परिसरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा लाभ होणार आहे. या वितरणाचा शुभारंभ देखील मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.