‘मुंबई वन’ ॲपवर मेट्रो २ अ आणि ७ चे तिकीट मिळणार
मुंबई दि.१८ :- मेट्रो २ अ आणि ७ चे तिकीट काढण्यासाठी ‘मुंबई वन’ हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ॲपवर मेट्रो २ अ आणि ७ च्या अंधेरी पश्चिम ते गुंदवली (दहिसरमार्गे) दरम्यानच्या सर्व स्थानकांचे तिकीट प्रवास सुरू करण्याआधीच काढता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई भेटीवर, त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण
मुंबईकर प्रवाशांसाठी येत्या २० जानेवारीपासून या ॲपच्या सहाय्याने तिकीट काढता येणार आहे. राष्ट्रीय समान वाहतूक कार्ड'(एनसीएमसी) ही मुंबईतील मेट्रो सेवेसाठी सुरू होणार आहे. हे कार्ड ‘रुपे’ अंतर्गत बँकेकडून खरेदी करता येईल. कार्ड रिचार्ज करून त्याआधारे ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.