‘आयुषमान भारत नोंदणी’ प्रक्रियेद्वारे रुग्णांची माहिती एका क्लिकवर
मुंबई दि.१४ :- बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून ‘डिजिटल आरोग्य मिशन’च्या मदतीने ‘आयुषमान भारत नोंदणी प्रक्रिया’ राबविली जाणार आहे. या नोंदणी क्रमांकाशी संलग्न असलेल्या रुग्णांच्या माहितीची नोंद एकाच ‘अॅप’द्वारे उपलब्ध होणार आहे. खासगी आणि महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांसाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील पाच प्रभागांमध्ये रुग्णांच्या संपूर्ण माहितीची नोंद ॲपद्वारे ठेवण्यात येत असून आरोग्याच्या संदर्भात काम करणाऱ्या ‘पाथ’ या संस्थेचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.
इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी वाशीत १२ केंद्रे
नोंदणी करणाऱ्या रुग्णाने कोणत्याही ठिकाणी उपचार घेतले तरीही त्या रुग्णांची संपूर्ण माहिती ‘अॅप’मध्ये नोंदविण्यात येणार असून संबंधित रुग्ण कितीही कालावधीनंतर वैद्यकीय उपचारासाठी गेल्यास त्याच्या आरोग्यासंदर्भातील संपूर्ण माहिती आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असणार आहे.
‘आभा’ नोंदणी क्रमांक सुविधेचा लाभ घेणाऱ्या डॉक्टर तसेच रुग्ण या दोघांनाही एक क्रमांक दिला जाणार आहे.
उर्फी जावेद हिला मुंबई पोलिसांची नोटीस
त्याद्वारे रुग्णालाही त्याच्या आरोग्यासंदर्भातील संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. पालिका रुग्णालयांचीही या प्रणालीमध्ये नोंद झाली असून केंद्र सरकाकडून अधिक सुस्पष्ट नियमावली आल्यानंतर या सुविधेचा वापर सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा कशी वापरायची याचे प्रशिक्षणही रुग्णालयांमधील वैद्यकीय तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.