ठळक बातम्या

इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी वाशीत १२ केंद्रे

वाशी दि.१४ :- इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी ‘महावितरण’ने वाशी मंडळात १२ नवीन चार्जिंग केंद्रे सुरू केली आहेत. ‘महावितरण’च्या ॲपवर या केंद्राची माहिती देण्यात आली आहे. ‘महावितरण’च्या वाशी मंडळातील ग्राहकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उर्फी जावेद हिला मुंबई पोलिसांची नोटीस

इलेक्ट्रीक चार्जिंगची ही केंद्रे रघुलीला मॉल, सेक्टर ३० उपकेंद्र, वाशी रेल्वेस्थानकाजवळ, सेक्टर २ खारघर उपकेंद्र, सेक्टर १९ ई-उपकेंद्र, गॅलेरीया मॉलजवळ, पामबीच रोड, सेक्टर १५ उपकेंद्र, ऐरोली उपकेंद्र, पावणे एमआयडीसी, सेक्टर ८ रबाळे एमआयडीसी उपकेंद्र, इंदिरा नगर उपकेंद्र, सेंट्रल रोड, ल्युब्रीझॉल कंपनीजवळ, तुर्भे, नवी मुंबई, टपाल नाका उपकेंद्र, पनवेल-उरण रोड, टपाल नाका, पनवेल, सेक्टर ५० सीवूड, नवी मुंबई, सेक्टर ९ पाम बीच उपकेंद्र, नेरूळ, नवी मुंबई, सेक्टर १५, सीबीडी उपकेंद्र, सीबीडी-बेलापूर येथे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *