मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.१४ :- विविध तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी (१५ जानेवारी) मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा-मुलुंड दोन्ही जलद मार्ग, तसेच पनवेल-वाशी दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड दोन्ही जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लाॅक असेल.
‘आयुषमान भारत नोंदणी’ प्रक्रियेद्वारे रुग्णांची माहिती एका क्लिकवर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर ठाणे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत मुलुंड आणि माटुंग्यादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरही पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी वाशीत १२ केंद्रे
पनवेल, बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगावकडे जाणाऱ्या लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत पनवेल येथून ठाण्याला जाणाऱ्या, तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान ठाणे येथून पनवेला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.