उर्फी जावेद हिला मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबई दि.१४ :- मुंबईतील रस्त्यांवर तोकड्या कपड्यांमध्ये फिरण्या प्रकरणी उर्फी जावेद हिला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा- आदित्य ठाकरे
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजाविली. उर्फी ला आज ( १४ जानेवारी ) अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. नग्नता आणि अश्लीलतेचा प्रचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता.