मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा- आदित्य ठाकरे
मुंबई दि.१३ :- मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बृहन्मुंबई महापालिकेची लूट या सरकारकडून केली जात आहे. सरकारने काढलेल्या रस्त्याच्या निविदेला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही निविदा रद्द करावी लागली.
‘गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध’ कार्यक्रमाचे आयोजन
त्यानंतर आता नवी निविदा काढण्यात आली आहे. ४०० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ६०८० कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली असून या निविदेतून कंत्राटदारांना ४८ टक्के फायदा करून देण्यात आला, असेही ठाकरे यांनी सांगितले.
महापालिकेत महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामे कशी मंजूर केली? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.