वैद्यकीय उपकरणे खरेदी कथित घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस
मुंबई दि.१३ :- करोना केंद्रांमध्ये वैद्यकीय उपकरणे खरेदीमधील कथित घोटाळ्या प्रकरणी बृहन्मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडी कडून नोटीस आल्याचा दावा, किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
‘गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध’ कार्यक्रमाचे आयोजन
हा संपूर्ण घोटाळा १०० कोटींचा असून बेनामी कंपनीला करोना केंद्राचे कंत्राट दिल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलविले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.