‘गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध’ कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दि.१३ :- नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ सावकार स्मृति विश्वस्त निधीतर्फे उद्या शनिवारी (१४ जानेवारी) ‘गोपीनाथ सावकार स्मृतिसुगंध’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविंद्र नाट्य मंदिर,पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला, प्रभादेवी येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
बृहन्मुंबई महापालिकेकडून ‘बेस्ट’ ला ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत
या कार्यक्रमात ‘कलामंदिर’ संस्थेतर्फे सादर झालेल्या मराठी संगीत नाटकातील नाट्य गीते सादर होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना सुभाष सराफ यांची असून या कार्यक्रमास माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, उद्योगपती अनिल खवंटे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती, ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड
श्रीरंग भावे, नूपुर गाडगीळ, श्रीया सोंडूर -बुवा नाट्य पदे सादर करणार असून त्यांना साई बँकर, निरंजन लेले संगीसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मुकुंद सराफ, प्रतिभा सराफ यांचे आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.