बृहन्मुंबई महापालिकेकडून ‘बेस्ट’ ला ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत
मुंबई दि.१३ :- बेस्ट उपक्रमाने दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने बेस्टला ४५० कोटी रुपये दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा तोटा सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी आर्थिक संकटात सापडलेल्या उपक्रमाला आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देता येत नव्हते.
महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती, ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड
तसेच वेतन देण्यासाठी कर्जही घ्यावे लागले होते. अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ४५० कोटी रुपये आणि टाटा पॉवर कंपनीची प्रलंबीत विद्युत देणी देण्यासाठी एक हजार ७७४ कोटी रुपये असे एकूण २ हजार २२४ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी बेस्ट उपक्रमाने बृहन्मुंबई महापालिकेकडे गेल्यावर्षी केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य शासनाकडून ३०० कोटींचा निधी
दैनंदिन खर्च भागविण्यासाठी बेस्ट उपक्रमाला अल्प मुदतीचे कर्ज घ्यावे लागले आहे. बृहन्मुंबई महापालिकेने नोव्हेंबर, डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ या तीन महिन्यांसाठी बेस्ट उपक्रमाला प्रत्येकी १५० कोटी रुपये उपलब्ध केले आहेत.