महारोजगार मेळाव्यात १४ हजार पदांसाठी मुलाखती, ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड
मुंबई दि.१३ :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत परळ येथील कामगार मैदान येथे गुरुवारी झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी विविध उद्योग, कंपन्या, आस्थापनांनी त्यांच्याकडील विविध पदांसाठी ४३० उमेदवारांची प्राथमिक निवड केली.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य शासनाकडून ३०० कोटींचा निधी
१ हजार २०० उमेदवार या मेळाव्यात सहभागी झाले होते. उर्वरीत उमेदवारांनी कंपन्यांकडे नोंदणी केली असून पात्रतेनुसार त्यांना संधी मिळणार आहे. मेळाव्यात विविध ३१ कंपन्यांनी सहभागी होत त्यांच्याकडील १४ हजार ९० जागांसाठी मुलाखती घेतल्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले.
ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना बॅंकांनी प्राधान्याने पतपुरवठा करावा- राजेश कुमार
कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये गेल्या महिन्याभरातील हा चौथा रोजगार मेळावा आहे. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.