ठळक बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य शासनाकडून ३०० कोटींचा निधी

मुंबई दि.१४ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणार आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. मात्र ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या सात ते दहा तारखेदरम्यान देण्याचे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयात दिले होते.

ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना बॅंकांनी प्राधान्याने पतपुरवठा करावा- राजेश कुमार

मात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार झालेला नाही. या महिन्यातही १२ तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त झाले होते. एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली.

डोंबिवलीत गुलाबाच्या फुलांचे प्रदर्शन

त्यानंतर ३०० कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रक्कम आजच (१३ जानेवारी) महामंडळाला देण्यात आली.  मात्र दिलेली रक्कम अपुरी आहे असे काँगेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आणि इतर १६ मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यशी लवकरच चर्चा केली जाईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *