ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना बॅंकांनी प्राधान्याने पतपुरवठा करावा- राजेश कुमार
नवी मुंबई दि.१३ :- महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.
डोंबिवलीत गुलाबाच्या फुलांचे प्रदर्शन
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने गुरुवारी नवी मुंबई येथे राज्यस्तरीय बँकर्स परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा गरिबी निर्मुलन आणि उपजीविका साधनांची निर्मिती करणारा देशातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे
या कार्यक्रमांतर्गत राज्यात बचत गटांची ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना भरीव अर्थ सहाय्य करणे आवश्यक आहे, असेही राजेश कुमार म्हणाले. राज्यातील बँकांनी या आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीचा तपशील ‘उमेद अभियाना’चे अतिरिक्त संचालक परमेश्वर राउत सादर केला. अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.