डोंबिवलीत गुलाबाच्या फुलांचे प्रदर्शन
डोंबिवली दि.१३ :- डोंबिवली रोझ फेस्टिव्हल आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शनाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात मुंबई, पुणे, नाशिक, शहापूर, पनवेल, वांगणी कर्जत आदी भागातून गुलाब पुष्पप्रेमी सहभागी झाले आहेत.
टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे
प्रदर्शनात एका हजारांहून अधिक गुलाबांची फुले पाहायला मिळणार आहेत. डोंबिवली पूर्व रामनगर मधील ‘आनंद बालभवन’ येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सांगलीच्या गजानन पटवर्धन यांनी गुलाब फुलांच्या टपाल तिकिटांचा संग्रह केला असून विविध देशातील ही टपाल तिकिटे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.