ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट – राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क

मुंबई दि.१२ :- वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. ही भेट सुमारे अडीच तासांची होती.‌

डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री दोन दिवस सहभागी होणार

रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांची नुकतीच युती झाली आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्यात युती करण्याबाबत बोलणी सुरू आहेत.‌मात्र त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क करण्यात येत आहेत. दरम्यान प्रत्येक भेट राजकीयच असते, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तरच त्यांच्याशी राजकीय चर्चा होऊ शकते, अन्यथा आमच्यात चर्चा होऊ शकत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांची इंदू मीलमधील स्मारकाबाबत भेट घेतली. नोएडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती तयार केली जात आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी सरकारने एक चमू पाठवल होता. या चमूमधील सदस्यांनी वेगवेगळे मत नोंदवले. याबाबत या बैठकीत चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *