ठळक बातम्या

दुरुस्तीच्या कामासाठी बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा आज रात्री ते शुक्रवार रात्रीपर्यंत बंद

ठाणे दि.१२ :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. या आस्थापनांचा पाणी पुरवठा गुरुवारी (ता.१२ ) रात्री १२ ते शुक्रवारी (ता.१३) रात्री १२ या कालावधीत दुरुस्तीच्या कामासाठी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या कालावधीत डोंबिवली एमआयडीसी, २७ गाव, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे औद्योगिक क्षेत्र, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, कल्याण डोंबिवली पालिका, उल्हासनगर, अंबरनाथ पालिका, नवी मुंबई, मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि परिसरातील ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी, पालिकांनी पाण्याची पुरेशी उपलब्धता करुन ठेवावी. नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरावे. उद्योजकांनी पाण्याची तात्पुरती सुविधा करुन ठेवावी, असे आवाहन एमआयडीसीतर्फे करण्यात आले आहे.

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमआयडीसीकडून बारवी धरणातून निघणाऱ्या गुरुत्व जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील उन्नत्तीकरणाचे काम गुरुवारी, शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी बारवी धरणातून करण्यात येणारा पाणी पुरवठा आणि जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *