परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्या प्रकरणी तीन जाहिरातदारांच्या विरोधात गुन्हा दाखल
कल्याण दि.१२ :- कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता शहराच्या विविध भागातील विजेचे खांब, पालिका, सार्वजनिक मालमत्तांवर जाहिरातीचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या तीन जाहिरातदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळा उडवून देण्याची धमकी देणा-या वक्तीला अटक
गेल्या काही महिन्यांपासून १० प्रभाग हद्दीत बेकायदा फलक हटविण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. आतापर्यंत दोन हजाराहून अधिक फलक कारवाई पथकाने हटविले आहेत. पालिकेच्या क प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीवरुन बाजारपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.