ठळक बातम्यावाहतूक दळणवळण

मेट्रो २ अ मार्गिकेमधील ‘पहाडी गोरेगाव’, ‘लोअर मालाड स्थानकांचे नाव बदलण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

मुंबई दि.११ :- दहिसर-अंधेरी-डीएननगर या मेट्रो २ अ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘पहाडी गोरेगाव’ व ‘लोअर मालाड’ स्थानकांची नावे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही नावे बदलून अनुक्रमे ‘बांगुरनगर’ व ‘कस्तुरी पार्क करावीत, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मेट्रो २ अ’ या मार्गिकेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

धीरूभाई अंबानी शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तरेशी जोडणारा हा मार्ग डीएननगर (अंधेरी पश्चिम) ते कांदिवली, मालाड, बोरिवलीहून दहिसरला जातो. यापैकी कांदिवलीतील डहाणूकरवाडी ते दहिसर या मार्गावरील सेवा एप्रिल महिन्यातच सुरू झाली. आता आठ स्थानकांचा पुढील व अखेरचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

पालिकांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारित करण्याचा निर्णय

मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव पश्चिमेकडे मालाडची खाडी आणि खाडीकिनारी पसरलेल्या कांदळवनाच्या भागात असलेल्या स्थानकाला ‘पहाडी गोरेगाव’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र हा परिसर वास्तवात ‘बांगूरनगर’ जवळ असून त्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे तेच नाव या स्थानकाला दिले जावे, अशी मागणी पूर्वीच करण्यात आली होती.

मुंबईत २०० इ बस सुरू करण्याचा ‘बेस्ट’ निर्णय

तसेच या मार्गिकेवर पुढील नियोजित स्थानक हे ‘लोअर मालाड’ नावाने ओळखले जाणार आहे. हा भाग ‘मालाड पश्चिम’ म्हणून ओळखला जात असताना ‘लोअर मालाड’ या नावाची गरज नाही. त्या भागाला ‘कस्तुरी पार्क’ हे नाव द्यायला हवे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत मिश्रा यांनीही नागरिकांच्या भावना निवेदनाद्वारे ‘एमएमआरडीए’पर्यंत पोहोचविल्या आहेत. आता काँग्रेसने त्या परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. नियोजित स्थानकांची नावे बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीए आयुक्त, स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *