धीरूभाई अंबानी शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मुंबई दि.११ :- धीरूभाई अंबानी शाळेला बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकी देणारा दूरध्वनी शाळेत आल्याने खळबळ उडाली. याप्करणी शाळेने वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पालिकांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारित करण्याचा निर्णय
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास शाळेच्या लँडलाईनवर एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणा-याने बॉम्ब ठेवल्याचे सांगून दूरध्वनी बंद केला.
मुंबईत २०० इ बस सुरू करण्याचा ‘बेस्ट’ निर्णय
शाळेने याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बॉम्ब शोध आणि निकामी पथक शाळेत पाठवून तपास सुरू केला. सुदैवाने शाळेत कुठेही बॉम्ब सापडला नाही.