महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक
मुंबई दि.११ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक अजित सिंग यांनी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील ‘रिले रेस’ या प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकाविले. सिंग हे भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.