ठळक बातम्या

दोन लाखांहून अधिक मुंबईकरांना ‘आपला दवाखान्यांचा’ लाभ

मुंबई दि.११ :- बृहन्मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ याचा लाभ आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक मुंबईकरांनी घेतला आहे.‌ बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ याचे लोकार्पण करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार याचे काम करण्यात येत आहे. सध्या ६६ ठिकाणी ‘आपल दवाखाना’ कार्यरत असून, ही संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत १०० इतकी वाढविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी दिली.

मेट्रो २ अ मार्गिकेमधील ‘पहाडी गोरेगाव’, ‘लोअर मालाड स्थानकांचे नाव बदलण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

‘आपला दवाखाना’ येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महापालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ‘आपला दवाखाना’ सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते  रात्री १० या वेळेत सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *