‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि.११ :- ‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारी ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका साकारली आहे. केसरकर यांच्या हस्ते मंगळवारी ‘शैक्षणिक दिशादर्शिका २०२३’ दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
मेट्रो २ अ मार्गिकेमधील ‘पहाडी गोरेगाव’, ‘लोअर मालाड स्थानकांचे नाव बदलण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही शिक्षण विभाग चांगले काम करीत आहे. हे काम अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी दिशादर्शिकेच्या माध्यमातून नियोजन करता येईल. तसेच ‘शिक्षणगाथा’ या त्रैमासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील यशस्वी गाथा इतरांपर्यंत पोहोचवून त्यांनाही प्रेरणा मिळेल, असेही केसरकर म्हणाले. डॉ.पालकर यांनी प्रास्ताविक केले तर, विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांनी आभार मानले.