देश एकसंध ठेवण्यात केरळचे मोठे योगदान- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई दि.०९ :- केरळमधील कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या आपल्या आयुष्यात दूरदृष्टीने देशातील चार भागात बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी व द्वारिका पुरी येथे धर्मपीठे निर्माण करून देशाची एकात्मता अखंड राखली. त्यामुळे भारत देश एकसंध ठेवण्यात केरळचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.
सावरकर तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण, रजत पदके मिळविली
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळ ख्रिश्चन कौन्सिल, मुंबई या संस्थेचा ६५ वा वार्षिकोत्सव अंधेरी येथे साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय भाषा देशाला जोडण्याचे महत्वाचे काम करतात. त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले पाहिजे.
मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे मुंबईतील केरळी समाजाने देखील मराठी भाषा शिकली पाहिजे असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते ६५ व्या वार्षिक दिन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी तसेच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य तसेच बारावीच्या परीक्षेत मराठी तसेच हिंदी भाषेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या केरळी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.