माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
मुंबई दि.०९ :- दूरदर्शनवर पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे सोमवारी सकाळी मुलुंड येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. दीर्घकाळ पुण्यात वास्तव्याला असणारे डॉ. मेहेंदळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सध्या ते मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होते.
मुंबई विमानतळावर ७५ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त
दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. डॉ. मेहेंदळे यांनी एकच प्याला, नांदा सौख्य भरे, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन आदी नाटकांतून काम केले होते.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी, १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी
‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम ते सादर करत होते. आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम हा कथासंग्रह आणि अन्य १८ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. लोकमान्य टिळक यांच्या अग्रलेखांवर त्यांनी ‘पीएचडी’ केली होती.